गुरुभेटीची ओढ लागली माझ्या मनी ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
फिरतो मी रानावनांतूनी ।
गुरु भेटती वनचर रूपांतूनी ।। १ ।।
पक्षी गाती हो मंजूळ गाणी ।
भक्तराज बाबांच्या
येतात आठवणी ।। २ ।।
भावाश्रू येतात हो दाटुनी ।
गेलो मी देहभान हरपूनी ।। ३ ।।
गुरुभेटीची ओढ लागली माझ्या मनी ।
वाटे परम पूज्यांना (टीप १) भेटावे कडकडूनी ।। ४ ।।
परम पूज्य सदा सूक्ष्मातून असती जवळी ।
जन्मोजन्मी त्यांनी घेतले मजशी चरणी ।। ५ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना
– श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.५.२०२१)
|