नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणार्या अधिवक्त्यांना ठार मारण्याची पाकिस्तानमधून धमकी
खांडवा (मध्यप्रदेश) – नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यावरून असीम जैस्वाल या अधिवक्त्यांना पाकिस्तानमधून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्स ॲपवरून धमकी देतांना जैस्वाल यांना शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधान केल्यावरून मुसलमानांकडून त्यांचा विरोध केला जात आहे.
Madhya Pradesh: A lawyer in Khandwa receives death threats from Pakistan for a social media post supporting Nupur Sharma, FIR lodgedhttps://t.co/Cr8vZaj4QE
— OpIndia.com (@OpIndia_com) July 31, 2022
संपादकीय भूमिकाप्रतिदिन पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे, हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होत आहे; मात्र भारतातील हिंदूंकडून धर्मांधांच्या विरोधात वैध मार्गानेही काही कृती होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! |