तमिळनाडूत नामांकित हिंदु व्यक्तीची हत्या करण्याचा कट उघड
इस्लामिक स्टेटशी संपर्कात असणार्या मीर अनस अली याला अटक
अंबुर (तमिळनाडू) – येथील मीर अनस अली या २२ वर्षांचा यांत्रिकी अभियंता (मॅकेनिकल इंजीनियर) असलेल्या विद्यार्थ्याला इस्लामिक स्टेटशी संबंध ठेवल्यावरून पोलिसांनी अटक केली. तो इस्लामिक स्टेटशी संबंध ठेवून भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचत होता. तो टेलीग्राम आणि अन्य सामाजिक माध्यमांवरून नियमितपणे इस्लामिक स्टेटच्या संपर्कात होता. पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी तो एका नामांकित व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचत होता.
तमिलनाडु : ISIS के साथ मिल आतंकी साजिश रचने वाला इंजीनियरिंग छात्र मीर अली गिरफ्तार, गैर-मुस्लिमों को डराने के लिए करने वाला था VIP की हत्या#Tamilnaduhttps://t.co/ayeMF8HNAQ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 31, 2022
इस्लामिक स्टेटच्या संपर्कात असलेल्या मदरशातील विद्यार्थ्यालाही अटक !
उत्तरप्रदेशमधील देवबंद येथून कर्नाटकातील फारूख नावाच्या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे. तोही इस्लामिक स्टेटच्या संपर्कात होता. तो मदरशातील विद्यार्थी आहे.
संपादकीय भूमिकादेशात धर्मांधांकडून हिंदूंच्या एकेक करून हत्या करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या घटनेतून लक्षात येत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे ! |