देहली न्यायालयाच्या निलंबित महिला न्यायाधीश आणि त्यांचे पती यांच्या विरोधात गुन्हा नोंद

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचे प्रकरण

नवी देहली – उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) देहली न्यायालयाच्या निलंबित न्यायाधीश रचना लखनपाल आणि त्यांचे पती अधिवक्ता आलोक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा २ कोटी ९९ लाख रुपयांची अधिक संपत्ती आढळून आली. वर्ष २०१६ मध्ये एका प्रकरणात अनुकूल आदेश देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी न्यायाधीश रचना लखनपाल आणि अधिवक्ता आलोक यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात वर्ष २०१८ मध्ये सीबीआयने आरोपपत्र प्रविष्ट केले होते.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचार नाही, असे एकतरी क्षेत्र शिल्लक आहे का ? ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !