ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे निधन

अधिवक्ता अभयनाथ यादव

वाराणसी – ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्ञानवापीमधील सर्वेक्षणाच्या वेळी अभयनाथ यादव यांनी न्यायालयाच्या आयुक्तांच्या भूमिकेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. यासह तेव्हा तळघराचा व्हिडिओ प्रसारित झाल्याविषयी आक्षेप घेत न्यायालयाकडे चौकशीची मागणी केली होती.

ज्ञानवापी प्रकरणी राखी सिंह यांच्या याचिकेवर दिवाणी न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीत अधिवक्ता अभयनाथ यादव हे मुसलमानांची बाजू मांडत होते. आयोगाचा कृती अहवाल उघड झाल्याविषयी त्यांनी आक्षेप घेतला होता.

ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिवक्ता मदनमोहन यादव यांनी दिली.