आमदार लक्ष्मण जगताप आणि बंधू शंकर जगताप यांच्या वतीने पुणे येथे अपंगांना कृत्रिम अवयवांचे विनामूल्य वाटप !
पिंपरी (जिल्हा पुणे) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल’ यांच्या वतीने पिंपळेगुरवमध्ये अपंगांसाठी २९ जुलै या दिवशी शिबिर घेण्यात आले. यामध्ये ३१४ अपंगांना कृत्रिम हात आणि पाय (जयपूर फूट), ‘व्हीलचेअर’ तसेच ‘ट्राय सायकल’ यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या शिबिराला शंकर जगताप, माजी महापौर उषा उपाख्य माई ढोरे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.