२ ऑगस्ट या दिवशी अधिवक्ता कै. गोविंद गांधी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आदरांजली सभा !
सातारा, ३१ जुलै (वार्ता.) – २ ऑगस्ट २०२२ या दिवशी अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता कै. गोविंद गांधी यांचा प्रथम स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री काळाराम मंदिरासमोरील महाजनवाडा मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तरी समस्त हिंदूंनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु महासभेचे प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ता सणस यांनी केले आहे.