आला गं श्रावण, सणांचा तो राजा ।
आला गं श्रावण,
सणांचा तो राजा ।
चला ग सयांनो,
सण-व्रते करू चला ।। १ ।।
आली ती पंचमी,
नागाची पूजा करण्या ।
तोच बंधू आमचा,
सकलांची करी रक्षा ।। २ ।।
जिवतीची करू पूजा, मुला-बाळांना ओवाळून ।
सुखी ठेव माते, आम्ही सकल तुझाच ठेवा गं ।। ३ ।।
आली आली पूनव, सागरास आली भरती ।
नारळ अर्पूया सागरासी, रक्षण्या हो सकलांसी ।। ४ ।।
आली राखी पौर्णिमा बंधूराजाची ।
बांधू राखी त्याला, मागू केवल रक्ष हिंदु राष्ट्रासी ।। ५ ।।
झिम्मा घालतच आली, जन्माष्टमी बाळकृष्णाची ।
आल्या गोपी सजून, रास खेळण्या बाळकृष्णाशी ।। ६ ।।
कसा जातो श्रावण कळेनाच कुणाला ।
म्हणूनच म्हणती त्याला सणांचा तो राजा ।। ७ ।।
असे सण-उत्सव केवळ हिंदु धर्मातच ।
करा त्याचे आचरण, होईल हिंदु धर्माचे रक्षण ।। ८ ।।
– रजनी नगरकर (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०२२)