मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ४८ इमारतींचा अनधिकृत भाग पाडण्याचा न्यायालयाचा आदेश !
मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ४८ गगनचुंबी इमारतींचा अनधिकृत भाग पाडण्याचा आदेश मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकार्यांना दिला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांच्या आदेशावर तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम्.एस्. कर्णिक यांच्या खंडपिठापुढे २९ जुलै या दिवशी ही सुनावणी झाली. ज्या इमारती बांधतांना उंचीच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, त्या इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याची सूचनाही न्यायालयाने दिली. अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिकार्यांवर ताशेरे ओढले.
संपादकीय भूमिकामहत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम होऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हायला हवी ! |