अवैध बांधकाम आणि विनापरवाना चालू असणारे उपाहारगृह ‘सील’ !
मिरज, ३१ जुलै (वार्ता.) – ब्राह्मणपुरी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक १ जवळील ‘ॐ शिव स्नॅक सेंटर’ उपाहारगृह अवैध बांधकाम आणि विनापरवाना चालू असल्याने ते ‘सील’ करण्यात आले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांसह अन्य उपस्थित होते.