सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या याचिकेवर ३ ऑगस्ट या दिवशी सुनावणी !

मुंबई – शिवसेना पक्षावर कुणाचा दावा खरा आहे, हे पहाण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गट यांला नोटीस बजावली होती. या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट या दिवशी होणार असलेली सुनावणी ३ ऑगस्ट या दिवशी होईल.

सरन्यायाधीश रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय खंडपिठासमोर ही सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपिठाकडे किंवा घटनात्मक पिठाकडे जाणार का ? याचा निर्णय ३ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंनी शपथपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. कोणत्या घटनात्मक विषयावर सुनावणी हवी ?, याविषयी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद या दिवशी न्यायालय निश्चित करणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का ? हेही याच दिवशी समजेल.