मेट्रोसाठी ‘आरे’ वसाहतीतील वृक्षतोडप्रकरणी पर्यावरणप्रेमींची निदर्शने !
मुंबई – ‘आरे’ वसाहतीतील मेट्रो कारशेडच्या कामासाठी या परिसरातील वृक्ष तोडण्यात आले होते. त्याविरोधात ३१ जुलै या दिवशी पर्यावरणप्रेमींनी आरे वसाहतीमध्ये निदर्शने केली. या आंदोलनात स्थानिक आदिवासीही सहभागी झाले होते.
सरकारने आरेतील मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम चालू केल्यापासून पर्यावरणप्रेमींनी या कामाला विरोध चालू केला होता. या कामासाठी मागील आठवड्यात वृक्षछाटणी करण्यात आली. त्याच काळात काही वृक्षही तोडण्यात आल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला होता. या प्रकरणी पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर ३१ जुलै या दिवशी आंदोलन करून वृक्षतोडीचा निषेध व्यक्त केला.