बदलापूर ते ठाणे मधील रेल्वे स्थानकांवर भ्रमणभाष चोरणार्यास अटक !
ठाणे – बदलापूर ते ठाणे या मार्गातील रेल्वे स्थानकांवर गर्दीच्या वेळेत प्रवाशांच्या जवळील भ्रमणभाष सराईतपणे चोरणारा अनिलकुमार वर्मा याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ८० सहस्र रुपयांचे १६ भ्रमणभाष जप्त केले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात एक पुरुष संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांच्या प्रश्नांमुळे तो घाबरून पळून जात होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडले. तो मूळचा उत्तरप्रदेशातील आहे. त्याने आतापर्यंत किती चोर्या केल्या आहेत, याची चौकशी चालू आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! |