‘इसिस मोड्युल’ प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून देशातील ६ राज्यांतील १३ ठिकाणी धाडी !
महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड यांचाही समावेश !
कोल्हापूर, ३१ जुलै (वार्ता.) – ‘इसिस मोड्युल’ प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने देशातील ६ राज्यांतील १३ ठिकाणी धाडी टाकल्या. यात मध्यप्रदेशातील भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी अन् कर्णावती, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर, उत्तरप्रदेशातील देवबंद, तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कागदपत्र आणि साहित्य जप्त केले आहे.
ISIS Module: NIA की बिहार के अररिया समेत 6 राज्यों में छापेमारी, आपत्तिजनक सामान-दस्तावेज बरामद https://t.co/z1IvMEEeFY
— Quick Area News (@techtoday468) July 31, 2022
या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की, या प्रकरणी २५ जून २०२२ मध्ये भारतीय दंडविधान कलम १५३ ‘ए’ आणि १५३ ‘बी’ च्या अंतर्गत १८, १८ बी, ३८, ३९ आणि ४० युए (पी) कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण चालू आहे.
रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील दोघे कह्यात !
या प्रकरणी रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील दोघा भावांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांचा चांदीचे दागिने सिद्ध बनवण्याचा व्यवसाय आहे. गेल्या ३ वर्षांपासून एका संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक काम करत असल्याचे भासवत होते. ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असणार्या या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कह्यात घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आतंकवादी संघटनांची पाळेमुळे ग्रामीण पातळीवरही किती खोलपर्यंत गेली आहेत, हेही या निमित्ताने उघड झाले.
संतप्त जमावाकडून ‘लब्ब्याक इमदाद फौंडेशन’ या संपर्क कार्यालयाची तोडफोड !
रेंदाळ येथे दोघांना कह्यात घेतल्याचे समजल्यावर त्यांच्याकडून चालवल्या जाणार्या ‘लब्ब्याक इमदाद फाऊंडेशन’ या संपर्क कार्यालयाची संतप्त जमावाने तोडफोड केली आहे.
‘इसिस मोड्युल’ म्हणजे काय ?
‘इसिस’ या आतंकवादी संघटनेसाठी देशातील मुसलमान युवकांना इतर धर्मियांविरुद्ध भडकावणे, हा ‘इसिस मोड्युल’चा मूळ हेतू आहे. इसिसच्या घडामोडींसाठी निधी गोळा करणे, सामाजिक माध्यमांचा वापर करणे, कट्टर विचारधारेचे समर्थक वाढवणे, इसिसचे संदेश युवकांमध्ये प्रसारित करणे, हेही या ‘मोड्युल’च्या माध्यमातून केले जाते.