गोतस्करांना साहाय्य करणार्या, तर गोरक्षकांना धमकी देणार्या पोलिसांवर कारवाई करावी ! – गोरक्षकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे – गोतस्करांना साहाय्य करणार्या, तर गोरक्षकांना धमकी देणार्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील गोरक्षक राहुल कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली. २५ जुलै या दिवशी नियाज कुरेशी आणि बाळू लोंढे हे दोघे टेंपोमधून १७ गोवंशियांना अवैधपणे कोंढवा येथील खाटिकाकडे नेत होते. या वेळी गोरक्षक राहुल कदम यांनी कात्रज, तसेच भारती विद्यापीठ येथील पोलिसांना याची माहिती कळवली. संबंधित पोलिसांनी गोतस्करांना न पकडता त्यांना सोडून देऊन गोरक्षकांनाच गाड्या न आडवण्याची धमकी दिली.
या प्रकरणी ‘गोतस्करांना पाठीशी घालणारे पोलीस निरीक्षक कळसकर आणि त्यांचे सहकारी यांच्यावर कारवाई करावी’, असे या पत्रात म्हटले आहे. टेंपोमधील काही गोवंश घायाळ झाले होते, तसेच जनावरांसाठी चारा-पाण्याचीही व्यवस्था नव्हती. ‘पोलिसांनी सहकार्य न करता गोरक्षकांनाच पुष्कळ दमदाटी केली’, असेही या पत्रात राहुल कदम यांनी सांगितले आहे. (असे पोलीस कायद्याचे रक्षक कि भक्षक ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|