हिंदूंना मांस विक्रीचे दुकान उघडण्याचे आवाहन केल्यामुळे धर्मांधांकडून प्रवीण नेट्टारू यांची हत्या झाल्याची शक्यता !
प्रवीण नेट्टारू यांनी स्वतः उघडले होते मांस विक्रीचे दुकान !
बेळ्ळारू (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी धर्मांधांकडून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागील एक कारण आता समोर आले आहे. प्रवीण नेट्टारू यांनी स्थानिक हिंदूंना हिंदूंच्या दुकानांतूनच मांस खरेदी करण्याचे आवाहन केले होते. नेट्टारू यांनी स्वतः ९ मासांपूर्वी मांस विक्रीचे दुकान उघडले होते. हे मांस विक्री करणार्या स्थानिक मुसलमानांना खटकले होते. यातूनच त्यांची हत्या करण्यात आली, असे सांगितले जात आहे. कर्नाटक राज्यामध्ये मुसलमान मांस विक्रेत्यांवर बहिष्कार घालण्याचे एक अभियान राबवण्यात येत आहे. त्याचे नेतृत्व नेट्टारू करत होते. त्यांनी हिंदूंना स्वतःचा पोल्ट्री (कोंबडीपालन) व्यवसाय चालू करण्याचे आवाहन केले होते.
Another theory emerges in the Praveen Nettaru murder: Did Jihadis kill him because he asked people to buy meat from Hindus? Read details https://t.co/TSzpyP6ZYa via @OpIndia_com
— OSD (@Intolrentndian) July 31, 2022
प्रवीण नेट्टारू यांना धमक्या येत असल्याचे पोलिसांना सांगूनही पोलीस निष्क्रीय ! – नेट्टारू यांच्या मेहुण्याचा आरोप
प्रवीण नेट्टारू यांच्या मेहुण्याने आरोप केला आहे की, प्रवीण सतत राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयीचे लिखाण सामाजिक माध्यमांतून प्रसारित करत होते. त्यामुळे त्यांना धमक्या नेहमीच येत असत. याविषयी त्यांनी पोलिसांना माहिती दिली होती; मात्र पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. हत्येच्या पूर्वीही त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. बेळ्ळारू येथील मांस विक्रीचा व्यवसाय मुसलमानांकडे आहे. त्या वेळी नेट्टारू यांनी स्वतःचे मांस विक्रीचे दुकान चालू केल्याने अन्य हिंदूंनीही ठिकठिकाणी अशी दुकाने उघडणे चालू केले होते. त्यामुळेही त्यांना धमक्या येत होत्या.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांनाही त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्याला सुरक्षा न मिळणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! |