बंगालमध्ये झारखंडमधील काँग्रेसच्या ३ आमदारांकडे सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड !
काँग्रेसकडून तिन्ही आमदार निलंबित
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या हावडा पोलिसांनी झारखंडमधील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी, राजेश कश्यप आणि नमन बिक्सल यांना अटक केली आहे. या आमदारांकडे मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली आहे. ही रोकड इतकी अधिक आहे की, ती मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले. हे आमदार हावडा येथे वाहनातून जात असतांना त्यांना अडवण्यात आले आणि वाहनाची झडती घेण्यात आली. तेव्हा ही रोकड सापडली. झारखंडचे आमदार बंगालमध्ये का आले होते ?, ते इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड कुठे घेऊन जात होते ?, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. चौकशीनंतरच याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून या आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.
Now, trouble in #Jharkhand: @INCIndia suspends 3 MLAs caught with huge amount of cash in #WestBengal https://t.co/3EIVSB4oYp @anshumalini3
— The Tribune (@thetribunechd) July 31, 2022
संपादकीय भूमिकायाविषयी जनतेला आश्चर्य वाटणार नाही ! देशातील बहुतेक लोकप्रतिनिधींकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती ते लोकप्रतिनिधी झाल्यावर गोळा होते, हे जनता गेली अनेक दशके पहात आहे. सर्व भ्रष्टाचारी संघटित असल्याने त्यांच्यावर केवळ राजकीय सूडापोटीच कधीतरी कारवाई होते ! देशातील भ्रष्टाचार खरोखरीच मुळासह नष्ट करायचा असेल, तर धर्माचरणी लोकप्रतिनिधीच हवेत ! |