सातार्यातील स्थळांना असणारी इंग्रज अधिकार्यांची नावे पालटण्याची मागणी
सातारा, ३० जुलै (वार्ता.) – महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळांना असलेली इंग्रज अधिकार्यांची नावे पालटून क्रांतीकारकांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी हिंदु एकता आंदोलन आणि भाजप यांच्या वतीने करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) याविषयीचे लेखी निवेदन महाबळेश्वर येथील तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना देण्यात आले. या वेळी हिंदु एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, भाजपचे प्रदेश सदस्य भरत पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील स्थळांची इंग्रजांची नावे पालटण्यासाठी मागणी करावी लागणे दुर्दैवी ! |