सांगली जिल्ह्यातील मराठी शाळेत ‘हँड ग्रेनेड’ सापडला !
सांगली – सांगली जिल्ह्यातील कुडनूर या गावातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये ‘हँड ग्रेनेड’ सापडला आहे. येथील मराठी शाळेत मुले चेंडू खेळत असतांना तो खिडकीतून आत गेल्याने ते चेंडू आणण्यासाठी खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांना हा ‘हँड ग्रेनेड’ दिसला. या मुलांनी याविषयी नागरिकांना सांगितल्यावर त्यांनी जत पोलिसांना कळवले.
यानंतर जत पोलीस ठाण्यातील पथक आणि सांगलीतील बाँबशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बाँबशोधक पथक हा ‘हँड ग्रेनेड’ घेऊन अधिक अन्वेषणासाठी सांगली येथे रवाना झाले आहेत. यापूर्वीही वर्ष २०१७ मध्ये कुडनूरमध्ये दोन बाँब सापडले होते. या घटनेमुळे डफळापूर, कुडनूर आणि जत या तालुक्यांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.