‘पोलखोल’ या ‘फेसबूक’ गटाच्या माध्यमातून महिलांची अपकीर्ती !
|
मळेगाव (जिल्हा सोलापूर) – येथील ‘पोलखोल’ या ‘फेसबूक’ गटामध्ये स्थानिक महिलांविषयी आक्षेपार्ह आणि महिलांची अपकीर्ती करणार्या पोस्ट ठेवल्या जात आहेत. गावातील महिला सरपंचांविरोधातही आक्षेपार्ह पोस्ट गटामध्ये ठेवल्या गेल्या. मळेगावातील ५० ते ६० नागरिकांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन संबंधित फेसबूक गटाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पांगरी पोलिसांनी एजाज शेख, अमर शेख आणि नवाज शेख या संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
‘फेसबूक’वरील पोलखोल या गटाच्या माध्यमातून महिलांची अपकीर्ती केल्याने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, तर काहींचे संसार मोडले जात आहेत. गावातील प्रतिष्ठित पुरुष आणि महिला यांची अपकीर्ती करणार्या पोस्ट ठेवल्या जात आहेत. (महिलांचे जगणेही कठीण करणार्या संबंधित आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास पुन्हा असे वागण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|