प्रथम चांगला साधक होणे आवश्यक !
‘आश्रमात येतांना माझ्या मनात विचार होता, ‘अंतिम संकलक बनायचे ध्येय ठेवूया.’ आश्रमात आल्यावर विचार आला, ‘आधी चांगला साधक बनायला पाहिजे. चांगला साधक बनल्यावर अंतिम संकलक इत्यादी काहीही बनू शकतो.’ या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘चांगला साधक असला की, कोणतीही सेवा दिली, तरी काही फरक पडत नाही.’’
नकारात्मक किंवा भूतकाळातील विचार करण्यापेक्षा सकारात्मक राहून तळमळीने साधना करावी !
‘पूर्वी माझ्या मनात ‘मी २२ ते २४ वर्षे साधना करत आहे. पुष्कळ काळ गेला, तरी मी साधनेत पुढे जात नाही’, असे विचार यायचे. आता मनातील सकारात्मक विचार वाढले असून माझ्या मनात ‘यापुढे जेवढी अधिक तळमळीने आणि उत्साहाने साधना करता येईल, तेवढी केली पाहिजे. पूर्वीच्या काळी कितीतरी जन्म साधना करावी लागायची’, असे विचार येतात. त्या विचारांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘मागचा विचार करायला नको. आता काय करता येईल, तेच पहायला पाहिजे. नाहीतर काही जण निराशेत जातात. सकारात्मक विचार करणे चांगले असते.’’
– सौ. कविता बेलसरे, पुणे