सूक्ष्म परीक्षण अचूक करणारे आणि त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !
१. पू. वामन यांना व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने अचूक समजणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे त्याविषयी समजते’, असे पू. वामन यांनी सांगणे
‘पू. वामन व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने अचूक ओळखतात. १८.५.२०२२ या दिवशी मी पू. वामन यांना विचारले, ‘‘तुम्हाला एखाद्या वस्तूवर आवरण आले आहे किंवा त्यात नकारात्मक ऊर्जा आहे’, हे कसे समजते ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘वाईट शक्तींनी आक्रमण केल्यावर काळ्या रंगाचे आवरण येते. तेव्हा मला काळा रंग दिसतो, तसेच वस्तूत सकारात्मक आणि चांगली स्पंदने असली, तर पिवळा रंग दिसतो. मला हे सगळे नारायण (परात्पर गुरु डॉ. आठवले) सांगतात. आपल्याला काही येत नाही.’’
२. पू. वामन प्रत्येक गोष्ट कृतीतून शिकवत असणे आणि त्यांनी साधनेचा दृष्टीकोन सहजतेने सांगणे
पू. वामन आम्हाला प्रत्येक गोष्ट त्यांच्या कृतीतूनच शिकवतात. ते इतक्या लहान वयात (३ वर्षे ८ मास) सूक्ष्मातील परीक्षण अचूक सांगतात. त्याच वेळी ‘हे परीक्षण आपण नारायणांमुळे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे) करतो आणि सांगूही शकतो. यात आपले काहीच कर्तेपण नाही’, हा साधनेचा दृष्टीकोनही ते सहजतेने सांगतात. ‘धन्य धन्य ती गुरुमाऊली आणि धन्य धन्य ते शिष्य !’ त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे केवळ अशक्य आहे.’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (१८.५.२०२२)
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.