पाक चिनी नागरिकांवरील आतंकवादी आक्रमणाच्या भरपाईपोटी त्यांना देणार ९१ कोटी रुपये !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान चीनच्या नागरिकांना १ कोटी १५ लाख डॉलर (९१ कोटी ३० लाख रुपये) हानीभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामधील सर्वांत मोठ्या जलविद्युत् प्रकल्पाच्या वेळी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १० चिनी नागरिक ठार, तर २६ नागरिक घायाळ झाले होते. ठार झालेल्यांमध्ये अधिक संख्येने अभियंते होते. पाकचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या आक्रमणामागे ‘रॉ’ ही भारताची गुप्तचर संस्था असल्याचा आरोप केला होता. या घटनेच्या प्रकरणी चीनने अप्रसन्नता व्यक्त केली होती. चीनची समजूत काढण्यासाठी पाकचे मंत्री कुरेशी आणि सैन्याधिकारी यांना चीनमध्ये जावे लागले होते.

संपादकीय भूमिका

दिवाळखोर होत असलेला पाक चीनकडून कर्ज घेतो आणि त्याच पैशांतून तो त्यांना हानी भरपाई देतो, असेच म्हणावे लागेल !