वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही ! – जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते ब्रॅड पिट
मुंबई – भारत एक अद्भुत देश आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत हा देश सतत पालटत असतो. जगात असे वैविध्यपूर्ण देश अल्पच आहेत. मी उत्तर भारताचा केलेला दौरा अजूनही माझ्या मनात ताजा आहे. तेथे अशा अनेक जागा आहेत, जिथे दिवसाही अंधार असतो. मी अनेक मंदिरांच्या घंटा वाजवल्या आहेत. (कुठे मंदिरांत बूट घालून चित्रीकरण करणारे आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवणारे भारतीय कलाकार, तर कुठे मंदिरांचे महत्त्व अनुभवणारे पिट यांच्यासारखे पाश्चात्त्य कलाकार ! – संपादक) वाराणसी येथील अनुभव तर अलौकिक आहे. वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही. मी आतापर्यंत जेवढे विश्वभ्रमण केले, त्यामध्ये या शहराला माझ्या मनात विशेष स्थान आहे, असे वक्तव्य जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते आणि चित्रपट निर्माते ब्रॅड पिट यांनी केले.
EXCLUSIVE: ऑस्कर विजेता ब्रैड पिट की ‘अमर उजाला’ से एक्सक्लूसिव बातचीत, बोले, जल्द जल्द लौटूंगा भारत भ्रमण पर#BulletTrainMovie#BradPitt@SonyPictures @PankajShuklaa @BulletTrain @PittOfficialhttps://t.co/EpTQSvCTK0
— Amar Ujala (@AmarUjalaNews) July 30, 2022
पिट हे निर्माते असलेला ‘बुलेट ट्रेन’ नावाचा चित्रपट पुढील आठवड्यात जगभरात प्रसारित होणार आहे. यानिमित्त एका हिंदी वृत्तपत्राने पिट यांची मुलाखत घेतली. तेव्हा त्यांनी भारताविषयी वरील गौरवोद्गार काढले. ‘मी पुन्हा एकदा भारताचा दौरा करण्यासाठी उत्सुक आहे’, असेही त्यांनी मुलाखतीत शेवटी सांगितले.
संपादकीय भूमिकाभारतातील किती कलाकारांचा आध्यात्मिक नगरी असलेल्या वाराणसीविषयी असा भाव आहे ? |