बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका गावात धर्मांध मुसलमानांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. परगंवा गावाच्या शेजारी असलेल्या लखौरा गावाचे प्रमुख राजेंद्र हे काही कावड यात्रेकरूंसह गंगानदीतून जल आणण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीवरून जात असतांना ही घटना घडली. या वेळी मुसलमान महिलांकडून घरांच्या छतांवरून घाणेरडे पाणी आणि दगड फेकण्यात आले. (धर्मांध मुसलमान महिलाही हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी पुढे असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) या घटनेवरून ग्रामप्रमुख शकीना यांचे सासरे इश्तियाक आणि त्यांच्या साथीदारांवर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. याघटनेनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|