पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा !
मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा !
नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ जुलै या दिवशी नाशिकच्या दौर्यावर आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे शिवसैनिक संतप्त आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या वेळी आंदोलन, मोर्चा किंवा अनुचित कृत्य घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे.