मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथील ‘मलिक रेसिडेन्सी’ इमारतीत १७ विद्युत् मीटरमध्ये छेडछाड !
ठाणे, २९ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील कळवा, शीळ आणि मुंब्रा या भागांमध्ये टोरेंट आस्थापनाच्या वतीने वीजपुरवठा केला जातो. आस्थापनाने पथके सिद्ध करून या भागात अन्वेषण मोहीम राबवली. त्या वेळी मुंब्रा येथील कौसा भागातील ‘मलिक रेसिडेन्सी’ या आलिशान इमारतीत १७ विद्युत् मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केली असल्याचे पथकाला आढळून आले. या प्रकरणी संबंधित ग्राहकांवर वीज कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वीज वितरण आस्थापनाने सांगितले आहे.
शीळ, मुंब्रा, तसेच कळवा या भागांत वीजचोरी होऊ नये, यासाठी टोरेंट आस्थापनाची पथके नियमितपणे काम करत आहेत. या पथकांनी केलेल्या अन्वेषणात वीजचोरीत मुसलमानबहुल वस्ती असलेले मुंब्रा शहर सर्वांत पुढे असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी नागरिक मीटर घेण्यास टाळाटाळ करत आहेत आणि अनधिकृत जोडणी घेऊन वीज वापरत आहेत. अनेक पांढरपेशे लोकही वीजचोरी करतांना आढळत आहेत. ‘वीजचोरी हा फौजदारी गुन्हा असून ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते’, असे टोरेंट आस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
कळवा, शीळ आणि मुंब्रा या भागांमध्ये एकूण २ लाख ८० सहस्रांच्या आसपास वीजग्राहक आहेत. यांपैकी २० सहस्र ग्राहकांचा विजेचा वापर शून्य, तर १० सहस्र ग्राहकांचा विजेचा वापर ३० युनिटच्या आतमध्ये होत असल्याचे आस्थापनाच्या निदर्शनास आले आहे.
संपादकीय भूमिका
|