पुणे येथील बोगस शिक्षकभरती घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी होणार

पुणे – आकुर्डी येथील एका शिक्षणसंस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ शिक्षकांची भरती काही शिक्षणाधिकार्‍यांच्या संगनमताने झाल्याचे चौकशीत उघडकीस झाले होते. या शिक्षकभरती घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी होणार आहे. या भरतीप्रक्रियेत २ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा (‘मनी लाँडरिंग’ झाल्याचा) संशय व्यक्त करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, दत्तात्रय शेंडकर आणि आणखी काही अधिकारी यांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०१९ या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

शिक्षकांच्या भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले आहे. २ ऑगस्टला शिक्षकभरती घोटाळ्यात नेमक्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, यांसह अन्य प्रकरणांचीही चौकशी करण्यात येणार आहे.