रथयात्रा ही गुरुदेवांची, जीवन धन्य करणारी ।
साधकांची प्रज्ञा जागृत करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘१३.७.२०२२ या दिवशी मी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव पाहिला. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्सव (टीप) पहात असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. रथोत्सव पाहिल्यानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जीवन धन्य केले’, असे मला वाटले. त्यांच्याच कृपेने सुचलेल्या काव्यपंक्ती त्यांनीच लिहून घेतल्या आहेत. त्या पुढे दिल्या आहेत.
टीप – वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
जन्मोत्सव रथयात्रा ।
रथयात्रा ही जीवनाची ।
आत्मस्वरूपाला परमात्म्यात विलीन करण्याची ।। १ ।।
रथयात्रा ही जीवनाची ।
दोष-अहंरूपी असुर नष्ट करण्याची ।
जीवन आनंदमय बनवण्याची ।। २ ।।
रथयात्रा ही जीवनाची ।
ईश्वरी गुणांची वृद्धी करण्याची ।
पावलोपावली गुरुकृपा अनुभवण्याची ।। ३ ।।
रथयात्रा ही जीवनाची ।
भावभक्ती वाढवण्याची ।
जीवन भक्तीमय करण्याची ।। ४ ।।
रथयात्रा ही जीवनाची ।
कृतज्ञतेची पुष्पे अर्पित करण्याची ।
गुरुचरणी लीन होण्याची ।। ५ ।।
रथयात्रा ही जीवनाची ।
आत्मानंद अनुभवण्याची ।
परमानंद अनुभवण्याची ।। ६ ।।
रथयात्रा ही जीवनाची ।
जीवनी गुरूंचे अस्तित्व अनुभवण्याची ।
द्वैतातून अद्वैताकडे जाण्याची ।। ७ ।।
रथयात्रा ही गुरुदेवांची ।
जीवन धन्य करणारी ।
जीवन धन्य करणारी ।। ८ ।।
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (१४.७.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक