श्रीरामाची कृपा अनुभवण्या तळमळीने सेवा करूया ।
‘बलोपासना’ सप्ताहाची सिद्धता सर्व जिल्ह्यांमध्ये चालू होती. त्या वेळी देवाने सुचवलेले काव्य येथे दिले आहे.
श्रीराम नवमी ते हनुमान जयंती सप्ताह बलोपासनेचा ।
शक्तीची उपासना करूनी घेऊ आनंद क्षणोक्षणीचा ।
बलोपासनेने क्षात्रतेज अन् शौर्य यांच्या पताका फडकावूया ।
श्रीरामाची कृपा अनुभवण्या तळमळीने सेवा करूया ।। १ ।।
परशुरामाच्या पावनभूमीत संघभावाने राहूया ।
चैतन्यशक्ती अनुभवण्या शौर्य जागृत करूया ।
बलोपासना सप्ताहात धर्मप्रेमींना सहभागी करून घेऊया ।
श्रीरामाची कृपा अनुभवण्या तळमळीने सेवा करूया ।। २ ।।
श्रीरामाचा पाळणा हृदयमंदिरी सजवूया ।
शरणागतीच्या दीपाने आरती ओवाळूया ।
संपर्करूपी पुष्प श्रीरामाच्या चरणी वाहूया ।
श्रीरामाची कृपा अनुभवण्या तळमळीने सेवा करूया ।। ३ ।।
चला बलोपासनेची सिद्धता करूया ।
‘जय श्रीराम’ अन् ‘जय हनुमान’ असा जयघोष करूया ।
मारुतिरायांप्रमाणे दास्यभक्ती करून गुरुकृपा संपादन करूया ।
श्रीरामाची कृपा अनुभवण्या तळमळीने सेवा करूया ।। ४ ।।
– श्रीकृष्णचरणी कृतज्ञता,
कु. पूजा दीपक धुरी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.