जयसिंगपूर बसस्थानकातील मोठ्या खड्डयांमुळे प्रवासी त्रस्त !
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), २८ जुलै (वार्ता.) – जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) बसस्थानकात प्रवेश करतांना मुख्य द्वाराजवळच मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. याच समवेत बाहेर जाण्याच्या ठिकाणीही खड्डा पडला आहे. यामुळे प्रवाशांना बसस्थानकात येतांना कसरत करत यावे लागते, तसेच गाडी आत येतांनाही आतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात झटके बसतात. हे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.