निकृष्ट काम केलेले ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होणार ! – पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार
पुणे – निकृष्ट पद्धतीने काम केल्याने शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाची किंमत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना मोजावी लागणार असून अयोग्य काम करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
गेले वर्षभर पुण्यामध्ये समान पाणीपुरवठा योजना, मलनिःसारण, भ्रमणध्वनीच्या केबल, विद्युत् केबल घालणे यांसह इतर अनेक कारणांसाठी रस्त्यांचे खोदकाम झाले आहे; मात्र काम झाल्यानंतर रस्ते पूर्ववत् करतांना ठेकेदार आणि अधिकारी यांनी चांगल्या दर्जाचे काम केले नाही. त्यामुळे रस्ते खचत असून खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. शहरातील १२० रस्ते दोषदायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) आहेत. त्यामुळे या कालावधीत रस्ते खराब झाल्यास ते पुन्हा दुरुस्त करून देणे, हे संबंधित ठेकेदाराचे दायित्व आहे; पण १२० पैकी केवळ २० ते २५ रस्त्यांची खोदकामामुळे चाळण झाली आहे, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिका
|