कावड यात्रेकरूंची सेवा करणार्या मुसलमान तरुणाला अज्ञातांकडून मारहाण
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथे कावड यात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूंची सेवा केल्यावरून काझी फरहान या तरुणाला अज्ञातांनी मारहाण करत त्यांच्यावर धारदार शस्त्राद्वारे वार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याविषयी फरहान म्हणाला, ‘‘मी शांकभरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले होते आणि कावड यात्रेकरूंची सेवा केली होती. यामुळेच माझ्यावर आक्रमण झाले.’’
Uttar Pradesh: One Qazi Farhan brutally beaten for serving Kanwariyas and getting Darshan of Goddess Shakambhari, case registeredhttps://t.co/wMRt8dQfFx
— OpIndia.com (@OpIndia_com) July 27, 2022
संपादकीय भूमिकाहिंदूंना निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव यांचे डोस पाजणारे याविषयी तोंड का उघडत नाहीत ? |