मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथे स्वामी अडगडानंद यांच्या आश्रमातील गोळीबारात एका साधूचा मृत्यू
मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – येथील सक्तेशगडमधील स्वामी अडगडानंद यांच्या परमहंस आश्रमामध्ये झालेल्या गोळीबारात जीवन बाबा उपाख्य जीत (वय ४५ वर्षे) या साधूचा मृत्यू झाला, तर आशीष महाराज हे घायाळ झाले. या गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.