गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त सहभागी होणार्या केरळमधील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे
१. श्री. सामजित्, आलपुझा, केरळ
‘जर मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’तून गुरूंचे महत्त्व कळल्यावर आनंद मिळाला, तर त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर किती आनंद होत असेल !’, हे मला व्यक्त करता येणार नाही. ‘धर्माचा प्रसार करणारा प्रत्येक साधक त्याच्या गुरूंवर सर्व सोपवून पुढे जातो’, हे मला समाजातील काही प्रसंगांतून शिकायला मिळाले.’
२. सौ. सुनीता एन्.आर्., एर्नाकुलम्, केरळ
‘मला भक्तीमय असा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मनापासून पहाता आला. त्या वेळी मला माझी वेगळीच अवस्था जाणवत होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘माझे पितर दत्तगुरूंच्या नामजपातून तृप्त झाल्यामुळे मला हे अनुभवता आले’, असे माझ्या लक्षात आले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ४.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |