संसदेतून निलंबित केलेल्या विरोधी पक्षातील खासदारांचे धरणे आंदोलन !
नवी देहली – संसदेत गोंधळ घातल्यावरून निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांतील खासदारांनी संसद भवनातील संकुलात असलेल्या गांधी यांच्या पुतळ्यासमोर गेल्या काही घंट्यांपासून ‘धरणे आंदोलन’ चालू केले आहे. गोंधळ घालणार्या एकूण २७ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यात लोकसभेच्या ४, तर राज्यसभेच्या २३ खासदारांचा समावेश आहे. खासदारांचे हे धरणे २७ जुलैला सकाळी ११ वाजता चालू झाले असून ते २९ जुलैला दुपारी १ वाजेपर्यंत चालू रहाणार आहे.
विपक्ष के निलंबित सांसदों का संसद के बाहर धरना जारी pic.twitter.com/jliBEMNLeD
— News24 (@news24tvchannel) July 28, 2022
निलंबित खासदारांच्या हातात ‘मोदी-शहा हुकूमशहा’ असे फलक होते. ‘सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. त्यामुळेच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे’, असा आरोप खासदारांनी केला आहे. ‘आप’चे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, गुजरातमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूचे सूत्र मी राज्यसभेत मांडत होतो; मात्र मला निलंबित करण्यात आले.
संपादकीय भूमिकास्वतः संसदेत गोंधळ घालून लाखो रुपयांची हानी करायची आणि वर आंदोलन करून स्वतःला निरपराध ठरवण्याचा प्रयत्न करायचा ! अशा खासदारांकडून संसदेच्या वाया गेलेल्या वेळेचा व्यय (खर्च) वसूल केला पाहिजे ! |