पुणे पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली घोषित !
पुणे – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांकडून आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी ३९ नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. यंदा कोरोना महामारीचे प्रमाण अल्प झाल्यामुळे कोणत्याही निर्बंधांविना उत्सव साजरा होत असल्याने सर्वांमध्येच आनंदाचे वातावरण आहे. निर्बंध जरी नसले, तरी नागरिकांनीही आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी मंडळांसाठी जारी केलेले काही नियम आणि अटी
१. श्रींच्या मूर्तीची स्थापना, तसेच आरास यांच्या संदर्भात गणेश मंडळाने स्वत:च्या मंडळाची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणे आवश्यक आहे.
२. श्री गणेशाच्या मूर्ती स्थापनेपूर्वीच सर्व मंडळांनी पोलिसांची अनुमती घेणे बंधनकारक आहे.
३. श्री गणेशमूर्तीची उंची मर्यादित असावी.
४. ध्वनीक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायालयाकडून ठरवून दिलेल्या अटीनुसार व्हावा.
५. मंडळामध्ये अथवा मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मद्यपान करू नये.
६. वर्गणी गोळा करण्याच्या नावाखाली नागरिकांवर बळजोरी करू नये.
७. कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी. वाळूच्या बादल्या भरून ठेवाव्यात.