(म्हणे) ‘२१ व्या शतकात पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणे दुर्दैवी !’
अभिनेते नसरूद्दीन शहा यांच्या पत्नी तथा हिंदुद्वेषी अभिनेत्री रत्ना पाठक-शहा यांच्याकडून हिंदु धर्मातील ‘करवा चौथ’ हेे व्रत अंधश्रद्धा असल्याचे संतापजनक विधान!
मुंबई – पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करायला मी वेडी नाही. सुशिक्षित महिलाही पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. ‘करवा चौथ’चे व्रत ही अंधश्रद्धा आहे. भारतात एका विधवेला भयाण आयुष्य जगावे लागते. याच भीतीपोटी महिला असले व्रत करतात. २१ व्या शतकात आपण असल्या गोष्टी करतो, हे खरेच दुर्दैव आहे, अशा शब्दांत हिंदुद्वेषी अभिनेत्री रत्ना पाठक-शहा यांनी अकलेचे तारे तोडले. ‘पिंकविला’ या संकेतस्थळावरील एका मुलाखतीमध्ये पाठक यांना ‘पतीच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’ यासारखे एखादे व्रत किंवा उपवास केला आहे का ?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील विधान केले. रत्ना पाठक-शहा या हिंदुद्वेषी वक्तव्यासाठी कुप्रसिद्ध असलेले अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी आहेत. रत्ना पाठक-शहा यांनी हिंदु धर्मातील व्रतांना अंधश्रद्धा ठरवल्याविषयी सामाजिक माध्यमांवरून त्यांच्याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बॉलीवुड के वेटरन एक्टर नसीरुद्दीन शाह की अभिनेत्री पत्नी रत्ना पाठक शाह ने हिंदू त्योहार पर जहर उगला है. उन्होंने करवा चौथ को महिलाओं की गुलामी और अंधविश्वास का प्रतीक बताया है… pic.twitter.com/v4lNApQkYx
— Abhinav_bebaak (@abhinavBebaak) July 28, 2022
सौदी अरेबियाशी तुलना करून भारताला धर्मांध ठरवण्याचा यांचा प्रयत्न !
‘आपण अत्यंत पुराणमतवादी आणि रुढीवादी समाजाकडे वाटचाल करत आहोत. येथे महिलांवर नेहमीच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. जगातील कोणत्याही पुराणमतवादी समाजाकडे पहा, सगळीकडे प्रथम महिलांवर ताशेरे ओढले जातात. सौदी अरेबियाकडेच बघा. आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत’, अशा प्रकारे सौदी अरेबियाशी तुलना करून या मुलाखतीमध्ये रत्ना पाठक-शहा यांनी भारताला धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पती अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही यापूर्वी हिंदुत्वनिष्ठांना धर्मांध ठरवणारे वक्तव्य केले आहे.
रत्ना पाठक शाह ने ‘करवा चौथ’ वाली टिप्पणी से मचाया विवाद, पूछा कि क्या भारत सऊदी अरब जैसा बनना चाहता है https://t.co/UcxSuwQAYa
— My India First (@MyIndiafirst) July 28, 2022
महिलांकडून रत्ना पाठक यांच्यावर टीका !
रत्ना पाठक-शहा यांनी मांडलेली हिंदुविरोधी मते अनेक महिलांना न पटल्याने त्यांनी सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून पाठक यांच्यावर टीका केली आहे.
संपादकीय भूमिका
|