हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्या सुषमा अंधारे यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती !
मुंबई – पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्या आंबेडकरवादी चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी २८ जुलै या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याकडे उपनेतेपदाचे दायित्व देण्यात आले आहे. वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रचारक म्हणून त्यांनी काम केले होते. यापूर्वी सुषमा अंधारे यांनी हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम यांच्याविषयी सार्वजनिक सभांतून अवमानकारक वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्हे यांच्या पुढाकाराने अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. डॉ. नीलम गोर्हे यांनी सुषमा अंधारे यांना शिवबंधन बांधले.