स्वतःच्या लहानसहान दुखण्यावर प्राथमिक उपचार म्हणून आयुर्वेदातील औषधांचा वापर करण्याची सवय लावा !
‘पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राच्या, तसेच विविध विज्ञापनांच्या प्रभावामुळे आजकाल थोडेसे जरी बरे वाटेनासे झाले की, लगेच स्वतःच्या मनाने ॲलोपॅथीतील औषधे सरसकटपणे घेतात.
युद्धकाळामध्ये ॲलोपॅथीतील औषधे सैन्यासाठी जास्त प्रमाणात राखून ठेवली जातात. त्यामुळे औषधांचा तुटवडा होतो. आपत्काळामध्ये अशा स्थितीमध्ये अडचण येऊ नये, यासाठी आतापासून स्वतःच्या लहानसहान त्रासांसाठी आयुर्वेदातील औषधांचा वापर करा. ॲलोपॅथीतील औषधे वापरण्यापेक्षा पुढे दिलेल्या सारणीनुसार त्या त्या विकारामध्ये उपयुक्त अशी आयुर्वेदातील औषधे वापरा !
सनातनची वरील सर्व औषधे आता उपलब्ध आहेत. येथे दिलेले प्रमाण हे सर्वसामान्य माहितीसाठीचे प्रमाण आहे. चूर्णाचे प्रमाण चहाच्या चमच्यानुसार दिले आहे. औषधांचे सविस्तर उपयोग औषधाच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. पत्रक सांभाळून ठेवावे. औषधे वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावीत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२२)