झारखंड येथील एका न्यायाधिशांची हत्या करणारे २ जण दोषी !
नवी देहली – गेल्या वर्षी झारखंडच्या रांची येथे एका न्यायाधिशाच्या हत्येवरून केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले. रिक्शाचालक राहुल वर्मा आणि लखन वर्मा अशी दोघांची नावे आहेत.
धनबाद के जज उत्तम आनंद की हत्या के मामले में सीबीआई की विशेष अदालत ने फैसला सुरक्षित रख लिया है.#Jharkhand https://t.co/vM9FsS9siW
— AajTak (@aajtak) July 28, 2022
गेल्या वर्षी २८ जुलैला अतिरिक्त सत्र न्यायाधीश उत्तम आनंद हे सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असता एका रिक्शाने त्यांना मागून धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला. आनंद हे माफियांशी संबंधित अनेक प्रकरणे हाताळत होते. ते स्थानिक आमदाराचा साहाय्यक सहभागी असलेल्या एका हत्येच्या प्रकरणाची सुनावणीही करत होते. (हत्या करणार्यांना शिक्षा मिळणार असली, तरी त्यामागील अदृश्य हातांवर कारवाई न होणे दुर्दैवी ! – संपादक)