पोलिसांनी दक्षिण भारतातील ३ मठांवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला !
|
बेंगळुरू / चेन्नई – भारताच्या अमृतमहोत्सवाच्या दिवशी, म्हणजे १५ ऑगस्ट या दिवशी दक्षिण भारतातील ३ मोठ्या मठांवर आतंकवादी आक्रमण करण्याचा कट तमिळनाडू आणि कर्नाटक पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनांशी संबंधित ४ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे.
गुप्तचर विभागाच्या माहितीवरून तमिळनाडू पोलिसांनी २६ जुलै या दिवशी इस्लामिक स्टेटशी संबंधित आसिफ मुस्तीन आणि यासिर नवाब यांना अटक केली. चौकशीच्या वेळी लक्षात आले की, आसिफने ३० लोकांचे जाळे सिद्ध केले होते, जे एक मास आधीपासून मठांची रेकी करत होते आणि आक्रमणासाठी स्फोटके अन् इतर आवश्यक वस्तू गोळा करत होते. २४ जुलै या दिवशी बेंगळुरू पोलिसांनी अख्तर हुसेन लष्कर आणि महंमद जुबा यांना अटक केली. चौकशीतून ‘ते हिंदूंवर आत्मघाती आक्रमण करणार होते’, असे उघड झाले. त्यांचा अल् कायदा या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेत भरती होण्याचाही प्रयत्न होता. ते सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तान येथे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. ते ‘टेलिग्राम अॅप’वरून मुसलमान तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होते. ते अफगाणिस्तानाही जाण्याचा प्रयत्न करत होते. ‘भारतात मुसलमानांना तिसर्या दर्जाचे नागरिक म्हणून वागवले जात आहे’, असा त्यांचा दावा होता. या दोघांकडून ‘सर तन से जुदा’ (धडापासून शिर वेगळे करणे) मोहिमेशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली आहेत. चौघांनीही त्यांच्या गुन्ह्यांची स्वीकृती दिली आहे.
सौजन्य टीवी 9 भारतवर्ष
कांची, शृंगेरी आणि रामचंद्रपुरा मठ होते जिहाद्यांचे लक्ष्य !शृंगेरी, कांची आणि रामचंद्रपुरा मठ हे जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य होते. या तिन्ही मठांना हिंदु धर्मात मोठे महत्त्व आहे. शृंगेरी शारदा पीठाची स्थापना कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथे आद्य शंकराचार्य यांनी केली होती. तमिळनाडूमधील कांचीपूरम् येथे कांची कामकोटी हे महत्त्वाचे पीठ आहे, तर रामचंद्रपुरा मठ कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात आहे. |
संपादकीय भूमिका
|