सौ. शालिनी मराठे रुग्णाईत असतांना त्यांना भेटायला आलेल्या नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत
‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या सौ. शालिनी मराठे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या पुष्कळ आजारी असतांना आश्रमातील सर्व साधक त्यांची वेळोवेळी काळजी घेत होते. त्या साधकांकडे पाहून मला चांगले वाटले. साधकांनी त्यांची खोली अत्यंत स्वच्छ ठेवली होती.
सौ. मराठेकाकू एवढ्या रुग्णाईत असूनही पुष्कळ आनंदी होत्या. आश्रमात ‘वयोवृद्ध आणि रुग्णाईत साधकांची किती चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते’, हे मला पहायला मिळाले आणि ते वैशिष्ट्यपूर्ण वाटले.’ – सौ. साधना सदानंद बर्वे
(श्री. प्रकाश मराठे यांच्या मामेभावाची पत्नी), होंडा, सत्तरी, गोवा. (१८.७.२०२२)
(‘मध्यंतरी माझ्या भावाचा भ्रमणभाष आला होता. तेव्हा त्याला मी आजारी असल्याचे कळले होते. त्यामुळे तो म्हणाला, ‘‘आता तू इतकी आजारी आहेस, तर तुला घरी पाठवतील ना ?’’ त्या वेळी मी त्याला ‘इथे साधकांची कशी काळजी घेतात आणि वयोवृद्ध साधकांना घरी किंवा रुग्णालयात मृत्यू येण्यापेक्षा या चैतन्यमय आश्रमात मृत्यू येण्याची इच्छा असते’, याविषयी सांगितले. त्याचा कल अध्यात्माकडे नसून समाजसेवेकडे आहे. त्यामुळे त्याला यातील किती समजले, ते ठाऊक नाही; पण बहुतांश समाजाच्या सनातनविषयी असणार्या अपसमजाविषयीचा हा भाग आहे. वरीलप्रमाणे कुणीही आश्रमात येऊन प्रत्यक्ष त्यांच्या नातेवाइकांची घेतली जाणारी काळजी आणि त्यांचे आश्रमातील आनंदी रहाणे पहातात, तेव्हाच त्यांचा यावर विश्वास बसतो.’ – सौ. छाया नाफडे)