मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगपती रतन टाटा यांची भेट !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची २७ जुलै या दिवशी सदिच्छा भेट घेतली. या वेळी रतन टाटा यांनी मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याविषयी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे यांनी ‘ट्वीट’ करून या भेटीची माहिती दिली.
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. @RNTata2000 यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी माझे मनापासून अभिनंदन केले तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/xDmtuLrGiZ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022