पन्हाळागड येथे पर्यटकांना मद्यपान करू देणार्या ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद !
कोल्हापूर, २७ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर एका झुणका-भाकरी केंद्रावर काही जणांच्या गटाने मद्यपान केले होते. या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ प्रसिद्धीमाध्यमांवर प्रसारित झाला होता. याविषयी पोलिसांनी ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर ‘महाराष्ट्र दारूबंदी कायद्या’च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या संदर्भात शिवसेना समन्वयक हर्षल सुर्वे यांनी मागणी केली, ‘येथे उपस्थित असणार्या पर्यटकांना शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा करावी, म्हणजे यापुढे कुणी गडावर मद्यपान करण्याचे धारिष्ट्य केल्यास त्यासाठी काय शिक्षा असते, हा संदेश त्यांनाही जाईल.’ (मद्यपान केल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाल्यावर आणि सहस्रो शिवभक्तांनी मोर्चा काढल्यावर पोलीस प्रशासनाला जाग येणे हे लज्जास्पद ! यापूर्वीही असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने काय प्रयत्न केले ?, गड ज्यांच्याकडे आहे, तो केंद्रीय पुरातत्व विभागही याविषयी काही करत नाही हे दुर्दैैव ! – संपादक)