उत्तरप्रदेशमध्ये कावड यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव: ओवैसी यांना पोटशूळ
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील कावड यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव केला जात आहे. कावड यात्रेकरूंना अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत; मात्र मुसलमानांनी उघड्यावर नमाजपठण केल्यास आक्रोश केला जात आहे, असे सांगत एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली.
#AsaduddinOwaisi : ‘उन पर फूल, हम पर बुलडोजर’, कांवड़ियों पर पुष्प वर्षा से असदुद्दीन ओवैसी को है दिक्कत#kanwariyas https://t.co/eFKXyiTar6
— India TV Hindi (@IndiaTVHindi) July 27, 2022
ओवैसी यांनी ट्वीट करून काही छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मुसलमानांना पोलिसांच्या गोळ्या खाव्या लागत आहेत. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा, समुहाने केलेली हत्या, बुलडोझर यांचा सामना करावा लागत आहे. उत्तरप्रदेश सरकारने कावड यात्रेच्या मार्गांवर मांसविक्रीवर बंदी घातली आहे. एकाचा द्वेष, तर दुसर्यावर प्रेम, असे का ?
मतपेटीसाठी ओवैसी यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत ! – भाजप
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, ओवैसी त्यांच्या मतपेटीसाठी अशी विधाने करत आहेत.