६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे
‘देवाच्या कृपेने मला श्री. निरंजन चोडणकर यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिज्ञासू धर्मप्रेमींना संपर्क करण्याच्या सेवेत सहभागी होता आले. ‘देवाला शिकवायचे असेल, तर तो कसेही नियोजन करू शकतो. केवळ आपली शरणागती वाढली पाहिजे’, हे मला शिकायला मिळाले.
१ अ. धर्मप्रेमींशी संपर्क करतांना जाणवलेली सूत्रे
१ अ १. निरंजनदादा धर्मप्रेमींना राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती समजून सांगतांना पोटतिडकीने अन् तळमळीने बोलत होते. त्या वेळी माझ्या मनावर त्याचे गांभीर्य बिंबले.
१ अ २. ‘देवाला मन अर्पण करणे, देवाचे साहाय्य घेणे आणि अखंड शरणागती पत्करणे’, यांचे महत्त्व लक्षात येणे : दादा संपर्कात काही ठिकाणी सांगत होते, ‘‘देवाला आपले तन किंवा धन नको, तर त्याला आपले मन पाहिजे. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करून निर्मळ झालेले मन देवाला हवे असते.’’ दादांनी ‘गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी एका शिष्याने ६० वेळा आश्रमाचे कुंपण मोडून पुन्हा बांधले’, ही गोष्ट सांगून ‘मन अर्पण करणे म्हणजे नेमके काय ?’, याविषयी सांगितले. त्यामुळे मन अर्पण करण्याचे महत्त्व माझ्या मनावर अक्षरशः कोरले गेले. त्या वेळी ‘मी नेमके हेच करत नाही’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. आता प्रत्येक वेळी ‘मला मन अर्पण करायचे आहे’, याची जाणीव होऊन सेवेतून आनंद घेता आला. ‘स्वबळावर नाही, तर देवाच्या बळावरच आपण काहीही करू शकतो. त्यासाठी ‘सतत देवाचे साहाय्य घेणे आणि त्यांची अखंड शरणागती पत्करणे’, हे प्रयत्न सातत्याने करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
१ इ. ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘धर्मांधांच्या आघातांच्या घटना’ यांविषयी ऐकतांना जाणवलेली सूत्रे
१. काही धर्मप्रेमी आणि निरंजनदादा ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘धर्मांधांच्या आघातांच्या घटना’ यांविषयी सांगत असतांना ‘स्वतःत वेगळेच गांभीर्य निर्माण होत आहे’, असे मला जाणवले. आतापर्यंत मी ‘लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी केलेले आघात’ यांच्या अनेक घटना वाचल्या होत्या. मी व्याख्यानात त्याविषयी सांगितलेही होते; पण ‘माझ्याकडून तो एक विषय म्हणून सांगण्याचा भाग होत होता’, हे माझ्या लक्षात आले.
२. ‘माझ्या जवळपासच्या गावांत ‘लव्ह जिहाद’चे पडसाद एवढ्या तीव्रतेने उमटत आहेत’, हे माझ्या प्रथमच लक्षात येत होते. ‘मी आतापर्यंत एवढ्या गांभीर्याने हे विषय कुठेच मांडले नाहीत’, असे लक्षात येऊन मला अस्वस्थ वाटत होते. ‘आघातांची भीषणता स्वतः गांभीर्याने लक्षात घेतली, तरच आपण इतरांमध्ये ते गांभीर्य निर्माण करू शकतो’, हे मला शिकायला मिळाले.
१ ई. संपूर्ण शरणागतीने प्रार्थना करून व्याख्यानातील सूत्रांतून परिस्थितीचे गांभीर्य आणि दाहकता मांडली जाणे
दुसर्या दिवशी मला एके ठिकाणी व्याख्यान करण्याची सेवा होती. त्याचे चिंतन करत असतांना माझे मन पुष्कळ अस्वस्थ झाले होते. ‘माझ्या मनात निर्माण झालेले गांभीर्य व्याख्यानाला जोडणार्या किमान ३ – ४ जणांच्या मनात निर्माण झाले पाहिजे’, असे मला वाटत होते; पण ‘हे सर्व माझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे’, हेही लक्षात येत होते.
त्या वेळी मी संपूर्ण शरणागतीने प्रार्थना केली आणि निरंजनदादांनी मांडलेली सूत्रे घेऊन विषय सांगितला. त्या वेळी विषय चालू असतांना ‘आज पुष्कळ आतून सांगितले जात आहे. आज सूत्रांतून परिस्थितीचे गांभीर्य आणि भीषणता मांडली जात आहे’, असे मला वाटले. संपूर्ण व्याख्यानाच्या कालावधीत मला असे अनुभवता आले.
‘माझी या व्याख्यानाच्या आधी झालेली विचारप्रक्रिया आणि व्याख्यानाच्या वेळी अनुभवलेली स्थिती’, हे सर्व केवळ धर्मप्रेमींच्या सेवेची फलनिष्पत्ती आहे आणि माझ्यात गांभीर्य निर्माण व्हावे, यासाठीच हे होते’, असेच मला वाटते.’
– कु. प्राची शिंत्रे, पुणे (२.११.२०२१)