हिंदु नावे धारण करून हिंदु मुलींची तस्करी करणार्या मुसलमान टोळीला अटक !
अलीगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
अलीगड (उत्तरप्रदेश) – हिंदु मुलींची तस्करी करणार्या ५ जणांच्या एका गटाला २६ जुलै या दिवशी पोलिसांनी अटक केली. या गटातील सर्व जण मुसलमान आहेत. या वेळी त्यांचे हिंदु नावे धारण केलेले आधारकार्डही जप्त करण्यात आले. नोकरीचे आमीष दाखवून झारखंड राज्यातून आणलेल्या ३ हिंदु मुलींनाही या प्रसंगी कह्यात घेण्यात आले. इतर पुरुषांना लग्नाचे आमीष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळून या पीडित मुलींना विकण्याचा या टोळीवर आरोप आहे.
अलीगढ़ में हिंदू लड़कियों की तस्करी का गैंग पकड़ा: गैंग का मुस्लिम सरगना हिंदू बनकर झारखंड से करता था सप्लाई, तीन लड़कियां मिलीं#Bihar #Aligarh https://t.co/mD0LFjkRPa pic.twitter.com/TzU7ckOZnt
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 27, 2022
सईद अंसारी हा या टोळीचा प्रमुख असून त्याच्याकडून राहुल गुप्ता या नावाचे आधारकार्ड जप्त करण्यात आले. त्याच्या समवेतच नफीसा बीबी, रहीम अंसारी, कलाम खान आणि अन्य एकाचा समावेश आहे. एका व्यक्तीच्या सूचनेवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने अलीगड पोलिसांनी येथील गांधी पार्कच्या बसस्थानकावरून सर्वांना अटक केली.
संपादकीय भूमिकाअशांवर उत्तरप्रदेश पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! |