सनातनच्या साधिका सौ. प्राजक्ता जोशी यांना पितृशोक
कुडाळ – येथील सनातनच्या साधिका ज्योतिष विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांचे वडील श्री. गजानन मार्तंड जोशी उपाख्य अप्पा (वय ८० वर्षे) यांचे २६ जुलै या दिवशी रेतीबंदर, मुंब्रा, जिल्हा ठाणे येथे रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, २ मुली, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. काही वर्षे ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करत असत. सनातनचे साधक श्री. संजय जोशी यांचे ते सासरे, तर संत पू. सौरभ जोशी यांचे ते आजोबा होत. सनातन परिवार दोन्ही जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.