राज्यात १७३ जणांना ‘स्वाईन फ्ल्यू’ची लागण !
७ जणांचा मृत्यू
मुंबई – राज्यात ‘स्वाईन फ्ल्यू’चा (विशिष्ट विषाणूंमुळे येणारा ताप) धोका वाढत आहे. पावसाळा चालू झाल्यापासून या तापाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात २४ जुलैपर्यंत १७३ जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यामध्ये जुलै २०२२ मध्ये आढळलेल्या २० रुग्णांपैकी गेल्या ८ दिवसांत २ महिलांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात स्वाईन फ्ल्यूचे सर्वाधिक म्हणजे ४३ रुग्ण मुंबईत आढळले असून मुंबईतील मृतांची संख्या शून्य आहे. पुणे २३, पालघर ३३, नाशिक १७, नागपूर शहर १४, कोल्हापूर शहर १४, ठाणे शहर २० आणि कल्याण-डोंबिवली शहर येथे ७ रुग्ण आढळले आहेत. या आजारामुळे कोल्हापूरमध्ये ३, पुणे आणि ठाणे येथे प्रत्येकी २ मृत्यूंची नोंद झाली आहे. स्वाईन फ्ल्यू आणि मंकीपॉक्स यांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेने पार्किंग प्लाझा रुग्णालयात प्रत्येकी ५० खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे.